Wednesday, February 2, 2011

प्रेमाचा खरा अर्थ

दूरवरच्या माळावर
मला एक वड दिसला होता
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला
मी त्याला विचारलं
टुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात
तर म्हनाला
मी तर पडलोय प्रेमात
तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं
प्रेम म्हनजे काय असतं
तर म्हनाला
प्रेम हे जगन्याचं भान असतं
पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं
बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं
वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं
अलगद झोळीत पडलेलं दान असतं
मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात पडलायस
तर म्हणाला
मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय
जिने मला गेल्या पावसात भिजवलं
मी त्याला म्हणालो
अरे मी तीला ओळखतो, सगळेच ओळ्खतात
ती तर सगळ्यानांच भिजवते
पण पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायसं
अरे मग तर तू मुर्खच
अरे तू स्वताकडे पाहिलयस का?
अर्धा तर जमिनीत रुतलेला
उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा
त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस
तर तो नुसताच गूढ़् हसला
इत्क्यात अंधारुन आले
आकाशात मेघच मेघ जमा झाले
तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता
पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती
त्याच्याशी खेळत होती
या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते
मी खिन्न मनाने
परत निघालो
थोडा दूर गेलो असेल तोच
काडकन आवाज झाला
प्रकाशाचा लोळ उठला
मेघातून निघालेली वीज
धाडकन वडावर कोसळली
मी त्याच्याकडे पाहिले
मरणाच्या दारात असुनही
तो हसत होता
मला म्हनाला
अरे मी तिच्यासोबत घालवलेला
हा क्षण मला पुरेसा आहे
मी समाधानाने प्राण सोडतो आहे
मी मात्र सुन्न झालो होतो
प्रेमाचा खरा अर्थ आता मला कळला होता

Tuesday, October 19, 2010

ना कळले कुणाला मझ्या मनातले

ना कळले कुणाला मझ्या मनातले
ना कळले कुणाला प्रेम माझ्या ह्र्दयातले
ना कळले कुणाला दुःख माझ्या माझ्यातले
सुखच सुख दिसते आहे माझ्या जिवनातले
थंडीच्या गारव्यात रखरखत्या उन्हात
मी त्याची वाट पाहिली
त्याला बघताच मी माझी न उरली
ना कळले कुणाला मझ्या मनातले
दिवस-रात्र आठवण काढते त्याची
बोलण्यासाठी तरसते त्याच्याशी
ह्र्दय हे आवरेणा
ना कळले कुणाला मझ्या मनातले
कळी उमलली मोगरा फ़ुलला
प्रेमाचा अंकुरहि सहज फ़ुट्ला
प्रेमीकांचा संगम झाला
ना कळले कुणाला मझ्या मनातले
तुला पाहीले प्रेम समजले
प्रीतीचे फ़ुल हळूच उमलले
तुला मी माझ्या ह्र्दयात बसविले
ना कळले कुणाला मझ्या मनातले
नजरेत तुझ्या मी स्वतःला हरविले
दुःखच दुःख उरले
गेलास तु दुर माझ्यापासूनी
ना कळले कुणाला मझ्या मनातले
जीवनातले सुख सहज सरले
रडणे मन वरुनी हसताना दिसले
फ़ुलही दिसले काटेही बोचले
ना कळले कुणाला मझ्या मनातले!!!

Friday, October 8, 2010

प्रेमाचा गुलकंद - प्र.के.अत्रे

बागेतुनि वा बाजारातुनि कुठुनि तरी 'त्या'ने
गुलाबपुष्पे आणुनि द्यावित 'तिज'ला नियमाने!
कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते!
गुलाब कसले? प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या!
लाल अक्षरे जणु लिहिलेल्या पाठपोट नुसत्या!
प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने!
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे!
कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा!
परि न सोडला तिने आपुला कधिही मुग्धपणा!
या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल!
तोहि कशाला प्रगत करी मग मनातले बोल!
अशा तर्हेने मास लोटले पुरेपूर सात,
खंड न पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात!
अखेर थकला! ढळली त्याचि प्रेमतपश्चर्या,
रंग दिसेना खुलावयाचा तिची शांत चर्या!
धडा मनाचा करुनि शेवटी म्हणे तिला, 'देवी!
(दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी.)
'बांधित आलो पूजा मी तुज आजवरी रोज!
तरि न उमगशी अजुनि कसे तू भक्तांचे काज?
गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सांग तरी सुंदरी, फुकट का ते सगळे गेले?'
तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, 'आळ वृथा हा की!
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी'
असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनि ये बाहेरी कसलीशी बरणी!
म्हणे, 'पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद!
कशास डोळे असे फिरविता का आली भोंड?
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड!'
क्षणैक दिसले तारांगण त्या,-परि शांत झाला!
तसाच बरणी आणि घेउनी खांद्यावरि आला!!
'प्रेमापायी भरला' बोले, 'भुर्दंड न थोडा!
प्रेमलाभ नच! गुलकंद तरी कशास हा दवडा?'
याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
ह्रदय थांबुनी कधीच नातरि तो असता 'खपला'!
तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेमनिराशेने
'प्रेमाचा गुलकंद' तयांनी चाटुनि हा बघणे!

Wednesday, May 26, 2010

मैत्री

जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते

ति म्हणजे " मैत्री
जो रक्ताची नातीच काय पण परक्याला पण खेचून आणतो

आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो

हीच मैत्री .......तो विश्वाचा एक धागा असतो
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री........... !!!!!!!!

एक मुलगी

एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..

वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति

कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली

आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास

मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?

तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.

मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..

ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु…?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु…

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास

युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास

हृदय अजून मराठी आहे

हृदय अजून मराठी आहे
विदेशी कपडे घातले तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत
पिझा, बर्गर खाल्ल्यावरही
पोट पुरणपोळीच मागतं
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी
मन मराठी चारोळीच मागतं
मात्रुभूमि सोडली की
आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं
भाषा सोडली की
अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं
वडाची झाडं मोठी होऊनही
परत मात्रुभूमिकडे झुकतात
कितीही दूर गेलं तरी
पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात
काहीही बदललं तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत

मुलगा मराठी

मराठी मुलगा....
कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वात साधा सुधा दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पण जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पण जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत मुले सिगरेट पिऊन येतात
पण जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पण जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो !!

ओर्कुट वर अनेक मुले असतात,
पण जो मित्रांना स्क्रॅप मध्ये (प्रेमाने) शिवी घालुन,
मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो ,
तो मुलगा मराठी असतो...

ऑनलाईन अनेक मुले असतात,
पण जो ओफिस चे काम नीट करुन,
मित्र परिवाराशीही बोलतो,
तो मुलगा मराठी असतो...

मेल FWD अनेक मुले करतात,
पण जो मुलींना embarassing वाटेल असे कही FWD करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...

चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात,
पण जो 'I Respect your Privacy'म्हणून,
मुलींना फोर्स करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...

मैत्री

काही माणसे असतात खास
काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात

...काळीज रडतंय

मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसतं पाहण्यासाठी,तुझी आस्व पुसण्यासाठी
तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा "

तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"

मग कसं कोण जाने,ती माझ्या मिठीत विरून गेली,
विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!!

आता मी मी राहिलो नव्हतो,न ती ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..

मग न जाने का , नजर माझीच लागली .....

मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत

त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...

पुन्हा येऊन पाहून जा ग
पत्रिका आहे आपल्याच लग्नाची ..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ..
ग प्रिये थोडं जळवण्यासाठी..

आज तिच्या प्रेतासोबत
माझंही प्रेत जळतंय...

जीव सोडला आहे....
तरीही काळीज रडतंय...
काळीज रडतंय........

आयुष्य असचं जगायचं असतं......!!!!!!!!!

जे घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं

आयुष्य असचं जगायचं असतं

कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, कुठतरी थांबायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं

आयुष्य असचं जगायचं असतं

दु ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं

पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


मरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं